Poetry from the sky!

on Wednesday, November 24, 2010
ढगाळलेले आकाश
अंधारात राहण्याची सवय होती मला,
प्रकाश पडला तर डोळे पांढरे व्हायचे.
पण तो दिवस काही वेगळाच होता,
ढगाळलेल्या आकाशात एक चंद्रमा दिसला.


काही दिवस वाटलं कि हा पौर्णिमेचा चंद्र,
येईल राहील आणि आभास सोडून जाईल.
पण त्या चंद्राचा रंग काही वेगळाच होता,
दगडावरील रेषेसारखा पक्का मनात ठसला.

ते ढग आता पुन्हा परत आले आहेत,
गेल्या वर्षभराच्या पावसाने सर्व दगड झीझले आहेत.
तरी त्या चंद्राची आठवण मनातून जात नाही,
आणि ढगाळलेल्या आकाशात त्याची प्रतिमाही दिसत नाही.

-Pradyumna Dandwate.

0 comments:

Post a Comment